माहिती आणि जनसंपर्क विभाग सेवा
 
विभाग देऊ सेवांची यादी
अ.क्र. नियम / अधिनियमातील तरतूदी विभागाचे कर्तव्य
1 - महानगरपालिकेच्या कामांना, ध्येय - धोरणांना, कार्यक्रम - उपक्रमांना विविध माध्यमांतून प्रसिध्दी देण्याबाबतची नियमित कार्यवाही करणे.
2 - महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर महानगरपालिकेची प्रसिध्दीपत्रके पूरक छायाचित्रांसह अपलोड करणे तसेच संकेतस्थळावरील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी बदलाच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
3 - महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका मसुद्यास मान्यता घेणेबाबतची कार्यवाही तसेच कार्यक्रम आयोजनात सर्वच विभागांना संपूर्ण करणे.
4 - महापालिकेस विविध कारणांनी भेट देणा-या मान्यवरांची स्वागतविषयक कार्यवाही करणे. तसेच मा. महापौर, मा. आयुक्त सूचित करतील त्याप्रमाणे मा. सर्वसाधारण सभेत मान्यवर, गुणवंतांचा सन्मान करणेबाबतची कार्यवाही.
5 - मा.महापौर, मा.आयुक्त यांचे निर्देशानुसार पत्रकार परिषदांचे आयोजन करणे.
6 - दैनंदिन वृत्तपत्रात प्रसिध्द होणा-या महापालिकेशी संबंधित बातम्यांची कात्रणे मा.आयुक्त यांचे निदर्शनास आणून देणे, विविध विभागांशी संबंधित बातम्या स्कॅनींग करून इ-मेलव्दारे व हार्ड कॉपी स्वरूपात दररोज माहितीसाठी उपलब्ध करून देणे, विभागांकडून बातम्यांविषयी मा.आयुक्त यांचे मान्यतेने खुलासा आल्यास प्रसिध्दीस देणे, दैनंदिन कात्रणांचे दस्तऐवज म्हणून बायडींग बुक्स स्वरुपात संकलन करणे.
7 म.शा.सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र.जपूति-2215/279/प्र.क्र.285/29,30 नोव्हे.2015 राष्ट्रीय महापुरूष यांचे जयंती / पुण्यातिथी कार्यक्रम तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे प्रसंगी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
8 शासन निर्णय क्र. जाहिरात 2009/प्र.क्र.137/का-34/31 ऑगस्ट 2009 विविध विभागांमार्फत जाहिरात स्वरूपात प्रसिध्दीसाठी देण्यात येणा-या निविदा सूचना, जाहीर आवाहने यांना शासकीय दराने रोटेशननुसार वर्तमानपत्रात प्रसिध्दी देणेकरीता दैनंदिन कार्यवाही करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, त्यांची देयके अदायगी कार्यवाही तसेच संबंधित विभागांना त्याची कात्रणे उपलब्ध करून देणे याबाबतची संपूर्ण कार्यवाही करणे.
9 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संबंधित सर्व विभागांच्या कामकाजामध्ये समन्वय राखणे, त्याबाबतच्या अद्ययावत सूचना, परिपत्रकांची माहिती सर्व विभागांना देणे, प्रत्येक विभागाकरीता संबंधित विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे सार्व. माहिती अधिकारी व अपिलिय अधिकारी परिपत्रकाव्दारे घोषित करणे, माहितीचा अधिकार विषयक सर्व विभागांची माहिती महापालिका संकेतस्थळावर अद्ययावत ठेवणेसाठी समन्वय साधणे, सर्व विभागांकडून माहितीचा अधिकार मासिक अहवाल व वार्षिक अहवाल संकलित करणे व शासनास सादर करणे.
10 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 म.शा. शासन निर्णय क्र.: एमसीओ-2015 / प्र,क्र.189/ नवि-14, 23 जून 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत संबंधित विभागांचे सेवाविषयक मासिक कार्यवाही अहवाल संकलित करणे व शासनाकडे पाठविणे, याबाबतच्या नोंदी व माहिती अद्ययावत ठेवणे.
11 महापालिका लोकशाही दिन म.शा.सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. प्रसुधा2011/प्र.क्र.189/11/18-अ/26 सप्टे.2012 दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणा-या महापालिका लोकशाही दिनाविषयाचा संपूर्ण पत्रव्यवहार, अर्जदार व संबंधित विभागांशी संपर्क तसेच याबाबतची संपूर्ण कार्यवाही.
12 महाराष्ट्र नागरी सेवा नियम जनसंपर्क विभागातील अधिकारी - कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी (रजा मंजूरी,वे.वा.मंजूरी,वेतन देयके,अतिकालिक भत्ते इ.) विषयक कार्यवाही.
13 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड मधील प्रकरण 11 तील दोन अन्वये 'रस्त्यांना नावे किंवा क्रमांक देणे' मधील 'अ' --------------------------- मा.सर्वसाधारण सभेने निश्चित केलेली विविध मार्ग, चौक, मैदाने, उद्याने, वास्तू इत्यादींचे नामकरण करणेबाबतची दि.13/12/2001 (ठराव क्र.1168) आणि या ठरावात सुधारणेबाबतची दि.30/6/2014 (ठराव क्र.625) रोजीची नियमावली महापालिका क्षेत्रातील रस्ते, चौक, उद्याने, मैदाने, महापालिकेच्या वास्तू यांची नामकरणविषयक कार्यवाही नियमावलीनुसार करणे, त्यासाठी संबंधित विभाग कार्यालयांच्या पाहणी अहवालानुसार मा. सर्वसाधारण सभेसाठी याबाबतचा प्रस्ताव सादर करणे आणि तेथील मंजूरीनंतर नामकरण समारंभ आयोजनविषयक कार्यवाही विभाग कार्यालयांमार्फत समन्वय राखून करणे.
14 - विविध विभागांना थेट दूरध्वनी उपलब्ध करून देणेबाबतची कार्यवाही, महापालिकेच्या सर्व विभागांची दूरध्वनी देयके, टोल फ्री क्रमांक, व्हॉटस् ॲप क्रमांक देयके अदायगी विषयक कार्यवाही तसेच अधिकारीवर्गाची निवासी दूरध्वनी व भ्रमणध्वनी देयके अदायगी करणे विषयीची कार्यवाही करणे.
15 - अधिकारीवर्गाची निवासी वर्तमानपत्र देयके व दालन आतिथ्य भत्ता देयके अदायगीविषयीची कार्यवाही करणे.
16 - शासकीय सशस्त्र सेना ध्वजदिन निधी आणि अंध निधी संकलन करणे व संबंधित विभागांकडे पोहचविणे विषयक कार्यवाही.
17 - नमुंमपा वार्षिक दिनदर्शिका आणि दैनंदिनी माहिती संकलन व संपादन संबंधातील कामे करणे.
18 - 'वॉक विथ कमिशनर' या अभिनव उपक्रमाविषयीचा पत्रव्यवहार करणे, सर्व विभागांशी समन्वय राखून कार्यपुर्तता अहवालविषयक कामे करणे.
Last updated on : 18/10/2016 16:10