निवडणूक विभाग 
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक/ पोट निवडणूक घेणे.
  • मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग रचना करणे. आरक्षण निश्चित करणे, सोडत काढणे. (महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 5, 5-अ, 6-ब)
  • मा. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणूक / पोट निवडणूकीकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरिता मतदार याद्या तयार करणे व प्रसिध्द करणे. (महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 7-अ)
  • निवडणूकीकरिता मतदान केंद्र तयार करणे.
  • महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करून प्रभावीपणे अंमलात आणणे.
  • सार्वत्रिक / पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार मतदान घेणे.
  • सार्वत्रिक / पोटनिवडणूक मतदानाचा निकाल जाहीर करणे.
  • सार्वत्रिक / पोटनिवडणूकीत निवडणूक आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात जाहीर करणे.
  • सार्वत्रिक / पोटनिवडणूकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा हिशोब सादर करून घेणे.
  • ज्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब विहित कालावधी सादर केला नाही त्यांना मा. विभागीय आयुक्तांकडून अनर्ह ठरविणेबाबत कार्यवाही करणे.
  • निवडून आलेल्या सदस्यांना अनर्ह ठरविणेबाबतची प्रकरणे सादर करणे ((महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 10)
  • महानगरपालिका सार्वत्रिक/ पोटनिवडणूकाबाबतची न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करणे.
  • माहिती अधिकार कलमान्वये माहिती उपलब्ध करून देणे. (माहितीचा अधिकार अधिनियम 2005)
Last updated on : 18/10/2016 16:10