Skip to Content विद्युत विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
- नमुंमपा हद्दीतील नविन दिवाबत्ती व्यवस्थेची संपूर्ण कामे, दिवाबत्ती सुधारणा, इमारती अंतर्गत विदयुतीकरण करणे, पथसंकेतविषयक कामे करणे.
- संपूर्ण नमुंमपा क्षेत्रातील दिवाबत्ती संबंधित सर्व प्रकारची भांडवली व महसूली कामे प्रस्तावित करणे व नविन कामांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
- नमुंमपा इमारती तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती संबंधित महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वीज देयके पारित करणे.
- विभाग स्तरावरील सर्व कामे जसे, दिवाबत्ती देखभाल व दुरुस्ती, अंतर्गत विदयुतीकरण, वीजदेयके भरणे, झालेलया कामांचे मोजमाप करणे, ठेकेदारांना देयके अदायगी करणे इ. सर्व कामे कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचेमार्फत उप आयुक्त (परिमंडळ) यांचे देखरेखीखाली काम करतात.
- नमुंमपा हद्दीतील सर्व विद्युत विषयक कामांची निविदा प्रक्रिया शहर अभियंता यांचे नियंत्रणाखाली केली जाते.
- नमुंमपा विदयुत विभागाचे कामकाजाचे धोरण निश्चित करणे, ते मान्य झाल्यानंतर त्यानुसार काम करणे.
- सन्मा. नगरसेवक, नागरीकांच्या तक्रारींची पाहणी व निवारण करणे.
- नमुंमपा हद्दीत नविन दिवाबत्ती व पथसंकेत लावणे तसेच अस्तित्वात असलेली दिवाबत्ती व पथसंकेतांची दुरुस्ती व सुधारणा करणे.
- नमुंमपा हद्दीत अस्तित्वात असलेली दिवाबत्ती सुधारणा करणे.
- नमुंमपा हद्दीतील सर्व नमुंमपा इमारती, हॉस्पिटल, विष्णुदास भावे नाटयगृह, विरंगुळा केंद्र, समाजमंदिरे इ. चे अंतर्गत विदयुतीकरण करणे व विद्युत व्यवस्थेची दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे.
Last updated on : 18/10/2016 16:10
Scroll To Top