क्रीडा व सांस्कृतिक विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
- विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करणे.
- महानगरपालिकांच्या शहरांना खेळासाठी जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महापालिका व खाजगी शाळांच्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
- महापालिका क्षेत्रात क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरु करणे.
- महापालिका क्षेत्रातील शालेय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तसेच विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती अदा करणे.
- महापालिका क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणा-या होतकरु खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणे
- क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे
- महापालिका क्षेत्रातील खेळाडूंकरीता हिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे
- महानगरपालिका आंतरविभाग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
- महापालिका मालकीचे राजीव गांधी क्रीडा संकुल व मदर तेरेसा बहुउद्देशिय सुविधा केंद्र देखभाल व भाडे तत्वावर उपलब्ध करुन देणे.
- खेळ किंवा संघ दत्तक घेऊन व्यावसायीक संघ तयार करणे.
Last updated on : 18/10/2016 17:10