सेक्टर 12 बोनकोडे व तुर्भे स्टोअर येथील कन्टेनमेंट झोनमधील कोव्हीड-19 मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 1400 हून अधिक नागरिकांची तपासणी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असताना ज्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित सापडलेले आहेत अशा तुर्भे व कोपरखैरणे विभागातीन कन्टेनमेंट झोनमध्ये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्प हाती घेण्यात आले आहेत.
26 मे पासून कोपरखैरणे विभागातील विविध क्षेत्रात हे कॅम्प सुरू असून आज सेक्टर 12 बोनकोडे येथील कन्टेटमेन्ट क्षेत्रात झालेल्या मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 1206 नागरिकांची कोव्हीड 19 च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली ज्यामध्ये 16 नागरिकांची कोरोना सदृष्य लक्षणे बघता त्यांची त्वरित स्वॅब टेस्टींग करण्यात आली आहे.
अशाच प्रकारे तुर्भे विभागातील कन्टेनमेंट क्षेत्रातही आजपासून मास स्क्रिनींग कॅम्प सुरू करण्यात आला असून त्याठिकाणी 264 नागरिकांची तपासणी करण्यात आली व त्यामधील कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या नागरिकाची त्वरित स्वॅब टेस्टींग करण्यात आली.
संसर्गातून होणारा कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करीत मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत सापडलेल्या भागातील कंन्टेनमेंट झोनकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापे तसेच तुर्भे नागरी आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे डॉ.डि.वाय.पाटील रुग्णालय आणि तेरणा रुग्णालय यांच्या डॉक्टरांचा समुह आणि महानगरपालिकेचे स्वयंसेवक पथक यांच्या माध्यमातून हे मास स्क्रिनींग राबविण्यात येत आहे.
याठिकाणी नागरिकांचे थर्मल स्कॅनींग करण्यात येत असून डॉक्टर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीसंबंधी माहिती जाणून घेत आहेत व तपासणी अंती त्यांना योग्य औषधोपचार दिला जात आहे. एखाद्या नागरिकामध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत असून त्याच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरित स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे.
उद्या 2 जून रोजी कोपरखैरणे विभागात खैरणे भागामध्ये तसेच तुर्भे विभागात सेक्टर 21 तुर्भे भागातील कन्टेनमेंट झोनमध्ये कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येणार आहे. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत सापडलेल्या भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सींग राखून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 01-06-2020 16:13:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update