साधूवासवाणी स्कूलच्या सह्याने स्वच्छता मोहिम
स्वच्छ भारत मिशनच्या निमीत्त"स्वच्छ हि सेवा" अंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 24/10/2018 रोजी तुर्भे विभाग कार्यक्षेत्रातील जुईनगर सेक्टर-11 परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साधुवासवाणी स्कुल व नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत परिसरामध्ये स्वच्छता मोहिम राबवुन स्वच्छ सर्वेक्षण 2019, ओला कचरा-सुका कचरा वर्गिकरण करणे,सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, वैयक्तिक स्वच्छता, प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर न करणे. याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर मोहिमेस तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी श्रीम. अंगाई साळुंखे, स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे, शाळेचे शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वच्छता निरिक्षक श्री. संजय बदे, श्री. जयेश पाटील, उप स्वच्छता निरिक्षक श्री. मनोज मोहिते, सोमेश्वर पाठक, श्री. मंगेश सालकर, श्री. मिलिंद अंबेकर, श्री. राजेंद्र बाविसकर, भुषण पाटील व नागरिक मोठयाप्रमाणात उपस्थित होते.
Published on : 25-10-2018 09:55:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update