मांस - मासळी विक्री, वाहतुक, साठवणूक करणा-या व्यावसायिकांना आवाहन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 386 (2) अन्वये दि. 25 जून 2019 रोजीच्या महानगरपालिका सर्वसाधारण सभा, ठराव क्रमांक 1138 नुसार मिळालेल्या मंजूरीप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मांस-मासळी यांची विक्री, वाहतुक परवाना तसेच तात्पुरते सुधारीत परवाना शुल्क निश्चित करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मांस - मासळी विक्री, वाहतुक, साठवणूक करणा-या व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
अक्र
|
मांस-मासळी विक्री केंद्र प्रकार
|
नियमित वार्षिक परवाना शुल्क
|
त्रैमासिक तात्पुरता परवाना शुल्क
|
1
|
चिकन विक्री
|
रू 500/-
|
रू. 1500/-
|
2
|
मटन विक्री
|
रू 750/-
|
रू. 2250/-
|
3
|
ब्युफेन विक्री
|
रू 1000/-
|
रू. 3000/-
|
4
|
पोर्क विक्री
|
रू. 1000/-
|
रू. 3000/-
|
5
|
चिकन व मटन एकत्रित विक्री
|
रू 1000/-
|
रू. 3000/-
|
6
|
मासळी विक्री
|
रू 50/-
|
रू. 500/-
|
7
|
मांस/मासळी प्रक्रीया केंद्र (कोल्ड स्टोरेज)
|
रू. 10,000/-
|
ताप्तुरता परवाना अनुज्ञेय नाही.
|
8
|
मुळ गावठाणमधील मासळी प्रक्रीया व विक्री केंद्र
|
रू. 500/-
|
रू. 1500/-
|
9
|
इतर
|
रू. 500/-
|
रू. 2500/-
|
10
|
मांस/मासळी/पशुधन वाहतुक करणे
|
रू. 1000/- प्रती मे. टन वाहन क्षमता
|
रू. 3000/- प्रती मे. टन वाहन क्षमता
|
यामध्ये अर्ज विनाशुल्क असून वार्षिक परवाना शुल्काच्या 25% रक्कम सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे दि. 1 मार्चपूर्वी नूतनीकरणासाठी अर्ज सादर करण्याची जबाबदारी परवानाधारकावर असेल. 1 मार्चनंतर उशिरा नूतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या परवानाधारकास विलंब शुल्क आकारले जाईल.
अ. क्र.
|
नुतनीकरणासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी
|
परवाना व्यतिरिक्त लागू विलंब शुल्क
|
1
|
1 मार्च ते 31 मे
|
परवाना शुल्काच्या 25%
|
2
|
1 जून ते 31 ऑगस्ट
|
परवाना शुल्काच्या 50%
|
3
|
1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर
|
परवाना शुल्काच्या 75%
|
4
|
1 डीसेंबर ते 28/29 फेब्रुवारी
|
परवाना शुल्काच्या 100%
|
त्या अनुषंगाने सर्व मांस-मासळी विक्री, वाहतुक, साठवणूक करणा-या व्यावसायिकांनी परवाना प्राप्तीसाठी पशुवैद्यकीय सेवा कार्यालयाकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे मांस - मासळी विक्री, वाहतुक, साठवणूक करणा-या व्यवसायिकांविरूध्द कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 18-01-2020 10:30:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update