महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्र.अध्यक्ष श्री. मुकेशजी सारवान यांची नवी मुंबई मनपा भेट

सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग विविध शासकीय प्रशासकिय विभागांना भेटी देत असून सफाई कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणेबाबत आयोग आग्रही असल्याबाबतचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई यांचे प्र. अध्यक्ष श्री. मुकेशजी सोनु सारवान यांनी नवी मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या सोयी सुविधांबाबत सकारात्मक काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व मौलीक सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांनी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई यांचे प्र. अध्यक्ष श्री. मुकेशजी सोनु सारवान यांचे स्वागत केले. यावेळी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, विरोधीपक्षनेते श्री. विजय चौगुले, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. किरणराज यादव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार तसेच मा. अध्यक्षांचे स्वीय सचिव श्री.एफ.डी.चावरीया व इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे म्हणणे समजून घेतले. तसेच पत्रकार परिषदेमध्ये आयोगाच्या कामाविषयी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आढावा बैठकीविषयी माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सफाई कामगारांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सकारात्मक काम करीत असून आगामी काळात अधिक चांगले काम करतील असा विश्वास महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई यांचे प्र. अध्यक्ष श्री. मुकेशजी सोनु सारवान यांनी व्यक्त केला.
Published on : 07-02-2020 13:04:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update