आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धा 2019-2020 (कलाविष्कार 2020)
नवी मुंबई महापालिका संचालित शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला व सांस्कृतिक गुणांना वाव मिळावा या उद्दात हेतूने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतिने नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धा 2019-2020 (कलाविष्कार 2020) चे आयोजन करण्यात आलेले आहे.
कलाविष्कार 2020 स्पर्धेमध्ये महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 74 शाळांना सहभाग नोंदविलेला असून त्याद्वारे 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी या स्पर्धेमुळे प्राप्त झालेली आहे. कला, नृत्य, गायन व इ. प्रकारामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैयक्तित व समुह अशा दोन्ही गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरची स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.3 फेब्रुवारी 2020 ते दि.14 फेब्रवारी 2020 या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या 5 केंद्रावर घेण्यात आलेली असून त्यामधुन उत्कृष्ट सादरीकरण करणा-या कलाकारांची उपांत्य फेरी दि.24 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. सदर फेरीअंती निवड झालेल्या कलाकारांचे सादरीकरणांची अंतिम फेरी दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे होणार आहे. अंतिम फेरी मध्ये गट निहाय विजेत्या शाळा तसेच कलाकारांना एकुण रु.2,85,000/- इतक्या रोख रक्कम
सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शाळा व त्यांच्या विद्यार्थी कलाकारांना पुढील वाटचाली करीता श्री.जयाजी नाथ, सभापती क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळामध्ये शिकणा-या विद्यर्थ्यांच्या कलागुणांना कौतुकाची थाप मिळावी या करीता नवी मुंबईतील कलाप्रेमी नागरीकांनी दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे होणा-या महाअंतिम फेरीकरीता उपस्थित रहावे असे आवहन श्री.जयवंत सुतार, महापौर नवी मुंबई महानगरपालिका यांनी केलेले आहे.
कलाविष्कार 2020 अंतिम फेरीकरीता नागरीकांनी मोठ्या संख्येन उपस्थित रहावे याकरीता विष्णुदास भावे नाट्गृहात प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त श्री.नितिन काळे यांनी दिलेली आहे.
Published on : 23-02-2020 07:49:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update