नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2020 प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांबाबत जाहीर आवाहन
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या पत्र क्र.रानिआ-मनपा-2020/प्रक्र.3/का.5 अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2020 करिता मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील कालबध्द कार्यक्रमानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2020 करिता दिनांक 09 मार्च 2020 रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर नागरिकांकडून हरकती व सूचना दिनांक 09 मार्च ते 16 मार्च 2020 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक विभाग तसेच संबंधित विभाग कार्यालय या ठिकाणी कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
Published on : 09-03-2020 05:52:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update