नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन
नवी मुंबई महानगरपालिका
* जाहीर आवाहन *
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरातील विविध देशात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून लाखो नागरिक बाधित झाले आहेत. आणि दिवसागणिक परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. आपल्या भारत देशातही कोरोनाचा प्रसार झाला असून तो रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
कोरोना विषाणू हा संसर्गातून प्रसारित होत असल्याने सरकारने 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. या काळात नागरिकांनी आपल्या घरातच राहून कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याची गरज आहे. या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला, दूध, फळे, औषधे अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नागरिकांना व्हावा व त्यांची अडचण होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे.
हे फार मोठे राष्ट्रीय संकट असून त्याचा मुकाबला सर्वांनी एकत्र येऊन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आगामी काळात कोरोनाचा प्रसार वाढल्यास संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना व त्यामधून मार्ग काढताना सर्वांचीच कसोटी लागणार आहे. त्यामुळे या लढाईत सर्वांचे विविध प्रकारचे सहकार्य व सहयोग आवश्यक आहे.
म्हणूनच या जाहीर निवेदनाद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध स्वरूपाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, उद्योग समूह, सहकार क्षेत्र तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा विविध संस्थांना यांना आवाहन करण्यात येत आहे की, कोरोना विषाणू प्रतिबंधासाठीच्या या लढाईत आपण स्वत:हून पुढे येत अन्नधान्याची पॅकेट्स / खाण्यासाठी तयार असलेले अथवा टिकाऊ खाद्यपदार्थ (अन्नधान्याच्या पॅकेट्सना प्राधान्य), मास्क, एन 95 मास्क, एनआरएम ऑक्सिजन मास्क, हॅँड ग्लोव्हज, लिक्विड सोप, सॅनिटायझर, औषधे, इतर जीवनावश्यक वस्तू अशा विविध प्रकारची स्वयंस्फुर्तीने मदत करू शकता. याशिवाय व्हेंटिलेटर्स, उशी व चादरींसह बेड्स, सक्शन मशीन, पीपीई किट्स, मेडिकल किट्स अशा वैद्यकीय साधनांचीही मदत अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे विविध रक्तगटांच्या रक्तदात्यांचीही गरज असून रक्तदानाकरिताही नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवक / मेडीकल व पॅरामेडीकल स्टाफ स्वरुपातील मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणावर गरज भासेल, त्यावेळी काम करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारची मदत कोणतीही संस्था करू इच्छित असल्यास त्यांनी ती मदत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातूनच करावी असे सूचित करण्यात येत असून, जेणेकरून योग्य माणसांपर्यंत मदत पोहचविली जाईल व त्याठिकाणी गर्दी न होता योग्य सामाजिक अंतर (Social Distancing) राखून साहित्य वितरणाची कार्यवाही योग्य प्रकारे करता येईल व कोरोनाचा प्रसार रोखण्याची काळजी घेण्यात येईल.
यापैकी कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आणि संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संबंधितांशी संपर्क साधून साहित्य संकलीत करण्याची व वितरणाची सुयोग्य कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आहे
------------------------------------------------------------
NAVI MUMBAI MUNICIPAL CORPORATION
* PUBLIC APPEAL *
The corona virus (COVID 19) has spread across multiple countries and infected thousands of people and has created serious health issues. Many countries are facing unprecedented challenge from COVID 19. The impact on the health of people all over the world continues to grow. India too is facing the outbreak of COVID- 19. As per the directives of Central and State Government the Navi Mumbai Municipal Corporation has taken different containment measures to prevent the wide spread of COVID-19.
The Government is taking several proactive preventive measures. Reiterating the importance of social distancing the government has called for a nationwide lockdown for 21 days. In this period people have to stay at home in order to break the Corona virus chain. During this period all steps have been taken by government to supply of life essential items such as Grocery, vegetables, fruits, medicines etc.
This is a nationwide crisis and we all have to come together to overcome this. In case in future if emergency situation arises, to face and to go through this disaster, everyone will face the hardship. Therefore for better outcomes, the support and meaningful contribution, participation and cooperation of every citizen is needed.
Therefore NMMC hereby appeal to all different types of NGOs, Mandals, Corporate Sector, Private Sector, Industrialists, Cooperative Societies and Hotel owner association, Chemist Association and IMA to come forward and participate in the fight against COVID-19 by willingly providing Grocery Packets / Ready to Eat food packets (Preferred are Grocery Packets), Masks, N-95 Masks, NRM Oxygen Mask, Sanitizers, Liquid Soaps, Hand Gloves, Blood Donors of Various Blood Groups, Ventilators, Beds along with mattresses, Suction Machines, PPE Kits, Medical Kits etc. In case of rise of emergency situation we may need volunteers/ medical and paramedical manpower’s as well in a big way to help people in this crucial moment.
Any Organization who wishes to provide any the above items are requested to route there items only through Navi Mumbai Municipal Corporation. Such that preventing measures of distancing will be taken care which will prevent COVID - 19 to spread.
The Navi Mumbai Municipal Corporation will organized a control system to identify the Needy. Such that every health received will reach to the right people.
Therefore NMMC appeals to all those who can provide any such kind of help to please contact us on Toll free No. 1800222309/10 and give their details, so that as matter of preparedness the NMMC will approach them as an when required.
Published on : 26-03-2020 14:38:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update