वाशी व सानपाडा विभागात कोव्हीड-19 विषयक विशेष तपासणी
कोरोना बाधीत रुग्णशोध मोहिमेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये आयोजित केले जाणारे मास स्क्रिनींग कॅम्प कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महत्वापूर्ण असून 26 मे पासून नागरिकांचा या कॅम्पना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज सेक्टर 7 वाशी येथे जुहुगांव नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 120 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले व त्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 08 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे सेक्टर 10 सानपाडा येथे सानपाडा नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 152 व्यक्तींचे मास स्क्रिनींग केले. तसेच सेक्टर 18 येथील मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 71 नागरिकांचा तपासणी करण्यात आली. यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 03 व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
उद्या दि. 20 जून रोजी करावेगांव, कोपरखैरणेगांव, सेक्टर 17 वाशी या तीन विभागात मास स्क्रिनींग शिबीर राबविण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिका सर्वोतोपरी उपाययोजना राबवित असून नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सींग राखावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 19-06-2020 14:47:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update