नेरुळ विभागामध्ये कोव्हीड-19 मास स्क्रिनींग तपासणी
+
कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना प्रत्यक्ष विभागांमध्ये जावून कोव्हीड 19 संबंधित तपासणी करण्यावर मास्क स्क्रिनींग कॅम्पव्दारे भर देण्यात येत असून विविध विभागात शिबीरे राबविण्यात येत आहेत.
26 मे पासून सुरु झालेल्या या मास्क स्क्रिनींग कॅम्पमध्ये दिनांक 23 जून 2020 रोजी सेक्टर 18 नेरुळ याठिकाणी 108 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे आज दिनांक 24 जून रोजी सेक्टर 8 नेरुळ येथे 157 नागरिकांची आणि सेक्टर 3 नेरुळ येथे 111 नागरिकांची व शिवाजी नगर नेरुळ भागात 192 नागरिकांची कोव्हीड 19 मास स्क्रिनींग तपासणी करण्यात आली.
तपासणी शिबीरामध्ये येणा-या नागरिकांचे सर्वप्रथम थर्मल स्क्रिनींग करण्यात येत असून त्यांच्याशी डॉक्टर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेत आहेत तसेच त्यांची आरोग्य तपासणी करीत आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी लगेच तपासली जात आहे. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब टेस्टींगसाठी पाठविण्यात येत आहे.
या मास स्क्रिनींग कॅम्पमधून कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्ती शोधून त्यांच्यावर त्वरीत उपचार सूरू करून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मदत होत आहे. तरी नागरिकांनी कोरोना बाधीत होणे टाळण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सींग राखावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 24-06-2020 16:06:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update