इंडिया बुल्स येथील गैरप्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमधील नाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये केवळ पुरूष व्यक्ती दाखल
पनवेल मध्ये इंडिया बुल्स येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आलेल्या महिलेशी झालेल्या गैरप्रकाराबाबत सदर गैरप्रकार हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड केंअर सेंटरमध्ये घडला असल्याची चुकीची माहिती सोशल मिडीयावरून प्रसारित झाल्याचे दिसून येत आहे.
तथापि सदर प्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या इंडिया बुल्स येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये घडलेला नाही. वास्तविकत: नवी मुंबई महानगरपालिकेने इंडिया बुल्स येथील कोव्हीड केंअर सेंटरमध्ये केवळ पुरुष रुग्ण अथवा पुरूष क्वारंटाईन व्यक्ती यांना दाखल केलेले आहे. त्याठिकाणी एकही महिला विलगीकरणासाठी दाखल नाही. त्यामुळे सदर गैरप्रकार हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये घडला असल्याचे वृत्त पूर्णत: चुकीचे आणि निराधार आहे.
या उलट नवी मुंबई महानगरपालिका आपल्या कोरोना बाधीत व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या संपर्कातील नागरिकांची संपूर्ण काळजी घेत असून नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापीत केलेल्या कोव्हीड केअर सेंटर, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल या तिन्ही रुग्णालयीन सेवांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा गैरप्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये घडला असल्याचे चूकीचे वृत्त प्रसारित करणे हे नवी मुंबई महानगरपालिकेची नाहक बदनामी करणारे आहे.
याविषयी महानगरपालिकेमार्फत हा स्वयंस्पष्ट खुलासा करण्यात येत असून नवी मुंबईकर नागरिकांना सुरक्षित व सुयोग्य सेवा पुरविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका अथक कटीबध्द आहे.
Published on : 17-07-2020 15:34:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update