नेरूळच्या एस.आय.ई.एस. मार्फत 50 हजार वॉशेबल मास्कचे सहकार्य
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असताना त्यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्याकडून अगदी सुरूवातीपासूनच विविध स्वरूपातील सहकार्य लाभले आहे.
अशाच प्रकारे नेरूळ येथील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चालविण्यात येणा-या एस.आय.ई.एस. स्कुल ऑफ पॅकेजींगच्या वतीने इंडिया बुल्स येथील महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटर करिता 100 कॉ-युगेटेड रिसायकेबल क्राफ्ट बेड्स गादी, उशा, कव्हर, बेड शीट्स सह देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एस.आय.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्किल डेव्हलपमेट सेलच्या वतीने गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देणा-या बिगेन या उपक्रमांतर्गत या महिलांकडून तयार करून घेण्यात आलेल्या 2 लक्ष धुवून वापर करता येणारे हिरव्या रंगाचे कापडी मास्क चार टप्प्यात महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेले आहेत.
या 2 लक्ष कापडी मास्कमधील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 50 हजार कापडी मास्क आज महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या सन्माननीय उपस्थितीत एस.आय.ई.एस. चे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश परमानंद यांनी महानगरपालिकेकडे सुपूर्द केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन उपआयु्क्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता श्री. संजय देसाई उपस्थित होते.
एस.आय.ई.एस. संस्थेने या सेवाभावी वृत्तीने मास्क दिलेच शिवाय या मास्कच्या निर्मितीच्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले त्याबद्दल आयुक्तांनी संस्थेचे कौतुक केले व महानगरपालिकेमार्फत आभारही व्यक्त केले.
Published on : 22-07-2020 14:21:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update