नवी मुंबईतील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता होणार दूर डॉ.डि.वाय.पाटील रूग्णालयासोबत 200 आय.सी.यू. बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्स उपलब्धतेचा करार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा महत्वाचा निर्णय
‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेऊन कोरानाची साखळी खंडीत करण्यासोबतच कोरानाबाधित रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याकडेही महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गंभीर स्वरुपाची लक्षणे असणा-या रुग्णांना आय.सी.यू. बेड्स उपलब्ध होण्यात येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्याकडे नियोजनबध्द पावले टाकण्यात येत आहेत.
रूग्ण सुविधांमध्ये वाढ करण्याचा असाच एक महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला असून महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आय.सी.यू. बेड्स उपलब्ध व्हावेत याकरीता नेरुळ, सेक्टर-5 येथील डॉ. ङि वाय. पाटील. रुग्णालयासोबत 200 आय.सी.यू. बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि डॉ. ङि वाय. पाटील रुग्णालयाच्या वतीने डॉ. डि.वाय.पाटील समुहाचे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांच्या मान्यतेने, रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल पेद्दावाड यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे उपस्थित होते.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड-19 रुग्णांसाठी महानगरपालिकेने 202 आय.सी.यू. बेड्स उपलब्ध करुन दिले असून, त्यामध्ये या अतिरिक्त 200 आय.सी.यू. बेड्सची लक्षणीय भर पडणार आहे. त्यामुळे एकूण 402 आय.सी.यू. बेड्स नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालयाच्या वतीने पहिल्या टप्प्यात 10 ऑगस्ट 2020 पर्यंत 50 आय.सी.यू. बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार असून, त्यानंतर 10 दिवसांच्या तीन टप्प्यात 30 दिवसांमध्ये उर्वरित बेड्स सहीत एकूण 200 आय.सी.यू. बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
त्यासोबतच 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन दिले जाणार असून, सद्यस्थितीत महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 93 व्हेंटिलेटर्समध्ये या 80 अतिरिक्त व्हेंटिलेटर्सची भर पडून एकूण 173 व्हेंटिलेटर्स नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरानामुळे मृत्यू होणारी रुग्णसंख्या शून्यावर आणण्याचा प्रयत्न विविध मार्गांतून केला जात असून, अतिगंभीर स्वरुपाच्या कोराना बाधितांसाठी ही आय.सी.यू. बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची उपलब्धी महत्वाची ठरणार आहे.
डॉ. ङि वाय. पाटील रुग्णालयामधील ही 200 आय.सी.यू. बेड्स व 80 व्हेंटिलेटर्सची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असून, रुग्णाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या रुग्णाचे उपचार महापालिकेमार्फत मोफत करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांना आवश्यक अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर काटेकोरपणे लक्ष देत असून, डॉ. ङि वाय. पाटील रुग्णालयासोबत नवीन 200 आय.सी.यू. बेड्स व 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध्ा करुन घेण्याचा हा करार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणारा व कोरोना बाधित नागरिकांना आय.सी.यू. बेड्स व व्हेंटिलेटर्सची आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणारा आहे.
Published on : 03-08-2020 19:28:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update