नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना 25 हजार दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर
*यावर्षीचा दिवाळी सण 14 नोव्हेंबर पासून सुरू होत असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सन 2019-20 वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना रू. 25 हजार व करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना रू. 19 हजार सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.*
यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी तसेच राज्य शासनाकडील बदलीने / प्रतिनियुक्ती / प्रशिक्षणार्थी अधिकारी - कर्मचारी यांना रू. 25 हजार सानुग्रह अनुदान दिले जात आहे.
तसेच किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी - कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना रू. 19 हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जात आहे.
याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पद्धतीवरील कर्मचा-यांप्रमाणे रू. 19 हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना रू. 9 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.
*सध्याच्या कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी सुरूवातीपासून कोव्हीड विरोधातील लढ्यात अत्यंत समर्पित भावनेने काम करीत असून त्यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता प्रशासक तथा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या या कर्मचारीहिताय निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात येत आहे.*
Published on : 06-11-2020 13:39:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update