महापालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची कोव्हीड 19 विशेष तपासणी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण आता काहीसे कमी होताना दिसत असले तरी मास्क, सुरक्षित अंतर व हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर नियमित करणे कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 23 टेस्टींग सेंटर तसेच एपीएमसी मार्केट व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांप्रमाणेच रेल्वे स्टेशन्स वरही कोव्हीड 19 टेस्टींग सेंटर सुरु करण्यात आली आहेत.
अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कोव्हीड 19 तपासणीसाठी 2 दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले होते. दि. 21 डिसेंबर रोजी 156 अँन्टीजन टेस्ट व 155 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. तसेच दि. 22 डिसेंबर रोजी 90 अँन्टीजन व 89 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. दोन्ही दिवशी प्रत्येकी 1 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी कोव्हीड प्रतिबंधासाठी चांगले काम केले असून त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका मुख्यालयात दोन दिवसीय विशेष कोव्हीड 19 तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
Published on : 22-12-2020 15:17:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update