राजीव गांधी क्रीडा संकुलातील मैदान व नेरूळ येथील फुटबॉल मैदान हे सराव सामने,स्पर्धांकरिता उपलब्ध
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे सेक्टर 3, सी.बी.डी. बेलापूर येथील स्व.राजीव गांधी क्रीडा संकुलामधील क्रिकेट मैदान तसेच नेरुळ से.19, नेरुळ येथील कै.यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान हे विविध स्पर्धा, सराव सामने अशा विविध कारणांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत असते. या अनुषंगाने सदर मैदाने ही खेळाडू, स्पोर्टस कल्ब, संस्था इ. घटकांसाठी सराव सामने, स्पर्धा व चित्रीकरणाकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीतील कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर ही मैदाने सराव सामने, स्पर्धा व चित्रीकरणाकरीता शासनाने निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य भाडे तत्वावर आरक्षित करता येतील.
त्यामध्ये सीबीडी बेलापूर येथील स्व.राजीव गांधी क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदान सोमवार वगळता तसेच कै.यशंवराव चव्हाण क्रीडांगणातील फुटबॉल मैदान हे सोमवार व मंगळवार वगळता इतर दिवशी आरक्षित करता येईल याची नोंद घ्यावयाची आहे. तरी संबधित संस्थांनी आरक्षणाकरीता नवी मुंबई महानगरपालिका, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, से.3, सी.बी.डी.बेलापूर याठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 07-01-2021 07:24:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update