केंद्रीय पर्यावरण, वन आणि जल वायू परिवर्तन मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दि.08 एप्रिल 2016 रोजीच्या 'नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2016' नुसार शहरातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक उपक्रम, कंपनी, नर्सिंग होम, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, क्रीडा संकुले व इतर वाणिज्य संस्थांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो अशा ठिकाणी कचरा वर्गीकरण करुन, त्यातील ओल्या कचऱ्याची आपल्या स्तरावर खत निर्मिती करुन, विल्हेवाट लावणेबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
तथापि नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 50 किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निर्माण होणाऱ्या काही वरील प्रकारच्या संस्था- आस्थापनांमार्फत अद्यापही कच-याचे वर्गीकरण करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वरील प्रकारच्या संस्था- आस्थापनांकरीता संस्थेच्या आवारातच कचरा वर्गीकरण करुन, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणाऱ्या तसेच प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या आणि डेब्रिज ऑन कॉलची सुविधा पुरविणाऱ्या महानगरपालिकेसमवेत काम करणा-या काही एजन्सींची माहिती देण्यात येत आहे.
अ. क्र.
|
संस्था / एजन्सीचे नाव
|
संस्था / एजन्सीमार्फत केले जाणारे काम
|
प्रतिनिधीचे नाव
|
भ्रमणध्वनी क्रमांक
|
01
|
मे.परिसर सखी विकास संस्था, बॉटल फॉर चेंज
|
प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करणे
|
श्रीम. श्रेया सुधीर
|
9967608060/ 8451955336
|
02
|
मे.ग्रीनरिच ग्रो इंडिया प्रा.लि.
|
ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत करणे
|
श्री. अक्षय ननावरे
|
8605800811
|
03
|
मे. स्वच्छ सस्टेनेबल सोल्युशन प्रा. लि.
|
ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत करणे
|
श्री. राहुल नैनानी
|
9769672111
|
04
|
मे. एसजेएमए इंजिनिअरींग सोल्युशन प्रा. लि.
|
डेब्रिज ऑन कॉल ची सुविधा पुरविणे
|
श्री. राजेश गुरव
|
8591256150
|
या 4 संस्था/ एजन्सी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विषयक कामे करीत असल्याने, दैनंदिन 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था, शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक उपक्रम, कंपनी, नर्सिंग होम, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, क्रीडा संकुले व इतर वाणिज्य संस्थानी आवश्यकता असल्यास या संस्था / एजन्सी यांच्याशी संपर्क साधावा व कचरा वर्गीकरण करुन, आपल्या स्तरावर ओला कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे याबाबत कार्यवाही करावी.