प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून 3497 हरकती / सूचना प्राप्त
मा. राज्य निवडणूक आयोग यांचे पत्र क्र. रानिआ / मनपा-2020 / प्रक्र.3 / का.5, दि. 02 फेब्रुवारी 2021 अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2021 मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने दि 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे.
या प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर दिनांक 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नागरिकांकडून हरकती / सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांच्या एकूण 3497 हरकती / सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
अक्र.
|
विभागाचे नाव
|
एकूण हरकती /सूचना
|
1
|
दिघा विभाग
|
129
|
2
|
ऐरोली विभाग
|
1108
|
3
|
घणसोली विभाग
|
395
|
4
|
कोपरखैरणे विभाग
|
420
|
5
|
वाशी विभाग
|
566
|
6
|
तुर्भे विभाग
|
393
|
7
|
नेरूळ विभाग
|
155
|
8
|
बेलापूर विभाग
|
161
|
9
|
निवडणूक विभाग मुख्यालय
|
170
|
|
एकूण
|
3497
|
Published on : 25-02-2021 05:54:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update