*नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पत्रकारांचे कोव्हीड लसीकरण*
कोव्हीड विरोधी लढ्यामध्ये विविध घटकांप्रमाणेच वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्या यांनी कोव्हीडविषयक माहिती जनतेपर्यंत पोहचिवण्यामध्ये महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्या अनुषंगाने वृ्त्त संकलन व प्रसारणासाठी कोव्हीड काळात व त्यानंतरही प्रभावीपणे काम करणा-या वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधींचे लसीकरण व्हावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सकारात्मक दृष्टीकोन जपत आज महानगरपालिकेच्या वतीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी व कॅमेरामन यांचे लसीकरण संपन्न झाले.
सीबीडी बेलापूर येथील अपोलो रूग्णालयामध्ये सीएसआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षाशी संलग्न विविध वृत्तपत्रे आणि वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधी व कॅमेरामन यांचे कोव्हीड लसीकरण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, संपन्न झाले. ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री. राजन विचारे यांनी याठिकाणी भेट देऊन विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत लसीकरणप्रसंगी शुभेच्छा दिल्या. दुपारी 12.30 ते 5 या वेळेत, 40 वृ्त्तपत्र, वृत्तत्रवाहिनी प्रतिनिधी व कॅमेरामन यांनी कोव्हीड लसीचा डोस घेतला.
प्रसार माध्यमांच्या कोव्हीड काळातील कार्याची जाणीव ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेने माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामन यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करून पुढाकार घेतल्याबद्दल लाभार्थींनी आभार व्यक्त केले.
Published on : 29-05-2021 15:31:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update