*मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-या आणखी 49 थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा*
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करून त्यास मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र या 2 महिन्याहून अधिक सवलतीच्या कालावधीतही अभय योजनेस प्रतिसाद न देणा-या व मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-या 31 मार्च 2021 पूर्वीच्या 26 मालमत्ता कर थकबाकीदारांना 1 ते 15 जून या कालावधीत मालमत्ता जप्ती / लिलावाची नोटीस बजाविण्यात आली होती.
अशाचप्रकारे *मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-या आणखी 49 थकबाकीदारांवर जप्ती / लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बेलापूर विभागातील 7 मालमत्ता, नेरुळ विभागातील 10 मालमत्ता, वाशी विभागातील 2 मालमत्ता, तुर्भे विभागातील 24 मालमत्ता, कोपरखैरणे विभागातील 4 मालमत्ता व घणसोली विभागातील 2 मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता धारकांची 107 कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत 75 मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत.*
या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून तरीही रक्कम न भरल्यास मालमत्ता अटकावणी करून जप्ती / लिलाव पर्यंतची धडक कारवाई करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे थकबाकीदारांच्या थकीत रक्कमेची विभागनिहाय माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु असून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत याबाबतचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि थकबाकीदारांना रितसर नोटीसा बजाविण्यात येत आहेत.
*मालमत्ताकर भरणे हे प्रत्येक मालमत्ताकर धारकाचे कर्तव्य असून याव्दारे जमा होणा-या महसूलातूनच नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने मालमत्ताकर थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाईची कटू वेळ येऊ न देता आपली मालमत्ताकराची थकबाकी तसेच नियमित मालमत्ताकर त्वरीत भरणा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 08-07-2021 07:24:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update