*विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक दाखले मिळविण्याकरिता शिबीर*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, गरजू महिला, विद्यार्थी, अनाथ मुले तसेच दिव्यांग व्यक्ती यांचेकरिता नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच शासनामार्फतही कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले / प्रमाणपत्रे मिळविण्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नयेत याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या सहयोगाने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
नवी मुंबईकर नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी हे आवश्यक दाखले उपलब्ध करुन देण्याकरिता दि.15 ते 21 सप्टेंबर 2021 या कालावधीत सकाळी 10.30 ते सायं. 4.30 या वेळेत कै.गौरव म्हात्रे मध्यवर्ती वाचनालय, सेक्टर 3 ए, सी.बी.डी.बेलापूर येथे पहिल्या मजल्यावर हे विशेष शिबीर राबविण्यात येत आहे.
यामध्ये - रहिवासी दाखला, वय अधिवास दाखला (DOMICILE CERTIFICATE), उत्पन्न दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची सुविधा असणार आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन नवी मुंबई महानगरपालिका तसेच शासनाच्या अनेक विभागांमार्फत राबविल्या जाणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे काढून घ्यावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 13-09-2021 12:53:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update