घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील समर्थ नगर, डी-मार्ट लगत, घणसोली, याठिकाणी आरसीसी जोत्याचे बांधकाम, जिजामाता नगर, घणसोली या ठिकाणी तळमजल्याचे बांधकाम आणि कौलआळी, घणसोली या ठिकाणी आरसीसी जोत्याचे अनधिकृत बांधकाम सुरु होते.
या तिनही बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता सदर बांधकाम अनधिकृतपणे सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार तीनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-10, जेसीबी-1, ब्रेकर-2, गॅस कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 27-09-2021 15:12:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update