नेरुळ विभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत शॉप नं-10, मिनी मार्केट, सेक्टर-09, नेरुळ (पु) येथे महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरुळ यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिका 10 मजुर, 02 पीकअप व्हॅन, 05 हातोडे तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 12-10-2021 14:51:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update