घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील अर्जुनवाडी, अष्टविनायक पत्राचाळ, घणसोली या ठिकाणी आरसीसी तळमजला बांधकाम तसेच सेक्टर 25 लगत, दत्तनगर, घणसोली येथे आरसीसी जोत्याचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-12, ब्रेकर-4, गॅस कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
या पूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
Published on : 13-10-2021 15:11:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update