वाशी विभागातील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभागअंतर्गत वाशीगांव येथील श्री दत्तु गोपाळ पाटील, घर नं -268, वाशीगांव, वाशी यांनी तळमजल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. अनाधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनाधिकृत बांधकामावर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, १० मजूर, १ गॅस कटर, २ हॅमर, ४ घन /हातोडे तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 09-12-2021 15:06:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update