नवी मुंबई महानगरपालिका आयोजित “ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2021-22”
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रीडा विषयक विविध स्पर्धा, कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. सध्याची कोव्हीड प्रभावित परिस्थिती व कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावली लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करुन त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता क्रीडा विभागाच्या वतीने अभिनव स्वरुपाच्या ऑनलाईन “न.मुं.म.पा. स्पोर्टस फेस्टिव्हल 2021-22” चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये “बुध्दीबळ स्पर्धा”, “योग स्पर्धां” तसेच “बॉस्केटबॉल स्किल चॅलेंज”, “फुटबॉल स्किल चॅलेंज”, आणि “फिटनेस चॅलेंज” अशा विविध ऑनलाईन स्पर्धाचा समावेश आहे. सदर स्पर्धाची नोंदणी ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.
सदर स्पर्धांच्या नोंदणीकरीता www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सर्व स्पर्धा वय वर्षे 14, 17, 19, 30 आणि खुल्या पुरुष व महिला अशा वयोगटात आयोजित करण्यात येत आहेत. स्पर्धेकरिता नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. 05 जानेवारी 2022, रात्री 10.00 वा. पर्यत आहे.
या स्पर्धा दि. 15 जानेवारी 2022 ते दि. 02 फे्ब्रुवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात तसेच प्रत्यक्ष मैदानात घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून प्रथम ऑनलाईन फेरीत पात्र ठरणा-या प्रत्येक खेळनिहाय गटातील 20 खेळाडूंची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात येऊन त्यांची अंतिम फेरी प्रत्यक्षात मैदानावर घेण्यात येतील.
या स्पर्धेमधील प्रत्येक गटातील अंतिम तीन पुरुष व तीन महिला विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी खेळाडूंना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील. नोंदणी व स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नोदणीकरिताच्या लिंकव्दारे उपलब्ध करुन दिलेली आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका आयोजित “ऑनलाईन स्पोर्टस फेस्टिव्हल 2021-22” मध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी केलेले आहे.
Published on : 20-12-2021 06:05:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update