कोपरखैरणे व ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत घर नंबर 83, महापेगाव, MIDC, कोपरखैरणे व घर क्र. 638, सेक्टर 04, कोपरखैरणे यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केल्यामुळे कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. तरीही सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू होते.
या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 05 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 4, ऐरोली येथील घर क्र. एन-34 व ए-43, येथे जी + 1 इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. त्यानुसार संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते.
या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 04 मजूर, 01 गॅसकटर, 02 इलेक्ट्रीक हॅमर व जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 31-01-2022 13:52:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update