*नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक – 2022 करिता प्रभागनिहाय मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिध्द*
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्र. रानिआ / मनपा- 2022 / प्र. क्र. 29 / का.5, दि. 16 जून 2022 अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2022 मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील कालबध्द कार्यक्रमानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता दिनांक 23 जून 2022 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर नागरिकांकडून हरकती व सूचना
दि. 23 जून 2022 ते 01 जुलै 2022 कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक विभाग व संबंधित विभाग कार्यालय याठिकाणी कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील, याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 22-06-2022 16:26:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update