कौपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत कोरखैरणे सेक्टर 18 येथील घर क्र.23, 24, 25, 26 यांना दिनांक 23 मे 2022 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1) वापरत बदल केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू केले होते.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे सेक्टर 1 ए येथील भूखंड क्र ४३ याठिकाणी असलेल्या अनधिकृत पावसाळी शेड वर कारवाई करून हे शेड हटविण्यात आलेले आहे. हे शेड हटविणे खर्चाचे वसुलीपोटी रुपये 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून अनधिकृत बांधकामापोटी रक्कम रु.10 हजार अशी एकूण रक्कम रु.20 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
या दोन्ही अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस पथक व 05 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर व जनरेटर, पीकअप वाहनाचा वापर करण्यात आला.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 29-07-2022 15:00:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update