‘अमृत महोत्सव रन’ मध्ये 3 हजाराहून अधिक नागरिकांनी धावत दिला देशभक्तीचा नारा
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘चला, धावूया देशाच्या उज्वल भविष्यासाठी’ असा संदेश प्रसारित करीत 3 हजाराहून अधिक धावपटू व नागरिकांनी उत्साही सहभाग घेत ‘अमृत महोत्सव रन’ यशस्वी केली.
नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने पामबीच मार्गावर ‘अमृत महोत्सव रन’चे लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या सहयोगाने आयोजन करण्यात आले होते. 10 कि.मी. व 5 कि.मी. अंतराच्या या अमृत महोत्सव रनमध्ये 1 हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होत देशाभिमान अभिव्यक्त केला.
या अमृत महोत्सव रन मध्ये सहभागी होणा-या नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ऐरोली विधानसभा सदस्य आ.श्री.गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य श्रीम. मंदाताई म्हात्रे, पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. कैलास शिंदे, सह पोलीस आयुक्त श्री. जय जाधव, माजी खासदार श्री.संजीव नाईक, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्री.रविंद्र इथापे, श्रीम.नेत्रा शिर्के, श्री.दशरथ भगत, श्रीम.शुभांगी पाटील, श्रीम. शशिकला पाटील, श्री. विशाल डोळस, पोलीस उपआयुक्त श्री.सुरेश मेंगडे, श्री.विवेक पानसरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.धनराज गरड, क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. बाबासाहेब राजळे, श्री.मनोजकुमार महाले, डॉ. श्रीराम पवार, श्री.नितिन नार्वेकर, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे, लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या श्रीम. रिचा समित आदी मान्यवर उपस्थित होते.
10 किमी अंतराच्या रनमध्ये सहभागी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या विशेष गटात पुरूष धावपटूंमध्ये श्री. गावित, श्री.संकेत जाधव व श्री.तुषार पवार हे प्रथम 3 क्रमांकाचे मानकरी ठरले. महिला धावपटूंमध्ये श्रीम. अर्चना पाटील यांनी प्रथम तसेच श्रीम. अश्विनी गभाळे यांनी व्दितीय व श्रीम. नेहा बोरकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
10 किमी अंतराच्या रनमध्ये 4 वयोगटांमध्ये प्रत्येकी 3 पारितोषिके प्रदान करण्यात आली तसेच 5 किमी अंतराच्या खुल्या रनमध्ये पहिल्या 3 क्रमांकाच्या महिला व पुरूष धावपटूंना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांनी आयोजित केलेल्या अमृत महोत्सव रनच्या निमित्ताने नागरिकांमध्ये फिटनेचा पर्यायाने आरोग्याचा संदेश प्रसारित होईल ही उत्तम गोष्ट असल्याचे सांगत आमदार श्री.गणेश नाईक यांनी घरोघरी फडकविलेला तिरंगा राष्ट्रध्वज 15 ऑगस्टनंतर त्याचा उचित सन्मान राखून जतन केला जावा असे आवाहन केले.
आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना अमृत महोत्सव रन सारखा उपक्रम देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक संकटे झेललेल्या, प्राणांचे बलिदान केलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करणारा असल्याचे सांगत प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकवावा असे आवाहन केले.
10 किमी रन – पुरूष गट
18 ते 29 वर्षे :- प्रथम – उमेश कटोरे, व्दितीय – कुलदीप चौहान, तृतीय – प्रिन्स मिश्रा
30 ते 40 वर्षे :- प्रथम – प्रितम सिंग, व्दितीय – गौरव कटियार, तृतीय – दयासागर यादव
41 ते 50 वर्षे :- प्रथम – श्रीकांत उगले, व्दितीय – सुंदरराज नाडर, तृतीय – समीर मांजरेकर
50 वर्षे व पुढील :- प्रथम – अरविंद सावंत, व्दितीय – नवनीत भंडारी, तृतीय – हरीनारायण रथ
10 किमी रन – महिला गट
18 ते 29 वर्षे :- प्रथम – वर्षा प्रजापती, व्दितीय – मोना पटवा, तृतीय – निकिता अडफाडकर
30 ते 40 वर्षे :- प्रथम – गुंजा सराफ, व्दितीय – रजनी सिंग, तृतीय – आंचल मरवाह
41 ते 50 वर्षे :- प्रथम – सयुरी दळवी, व्दितीय – वैशाली गर्ग, तृतीय – श्रेया आयरे
50 वर्षे व पुढील :- प्रथम – डॉ. वंदना चंद्रन, व्दितीय – निता शाह, तृतीय – गीता रामास्वामी
05 किमी रन – खुला पुरूष गट
प्रथम – आकाश शिंदे, व्दितीय – उपेंद्र यादव, तृतीय – आलोक मिश्रा
05 किमी रन – खुला महिला गट
प्रथम – दिव्या गायकवाड, व्दितीय – धनश्री कंक, तृतीय - रोशनी जुनघरे
Published on : 15-08-2022 12:38:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update