*सफाईमित्र सुरक्षित शहराचा गजर करीत सफाईमित्रांनी उत्साहात साजरा केला दहीहंडी उत्सव*
.jpeg)
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले असून मलनि:स्सारण विषयक कामांमध्ये यांत्रिकी पध्दतीचा वापर करून सफाईमित्रांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दैनंदिन कामांमधून विरंगुळा म्हणून या 100 हून अधिक सफाईमित्रांनी एकत्र येत दहीहंडीचा गोपाळकाला उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला.
सेक्टर 50 नेरुळ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्राच्या आवारात दहीहंडी उभारण्यात आली होती. गोविंदा रे गोपाळाचा गजर करीत 3 थरांची ही दहीहंडी सफाईमित्रांनी एकत्र येत फोडली. 100 हून अधिक सफाईमित्रांनी एकात्म भावनेचा अविष्कार घडवित अत्यंत आनंदाने हा दहीहंडी उत्सव साजरा केला. नवी मुंबई हे सफाईमित्र सुरक्षित शहर असल्याचे फलक या दहीहंडीच्या भोवती झळकत होते. याप्रसंगी उप अभियंता श्री. वसंत पडघन, कनिष्ठ अभियंता श्री. स्वप्निल देसाई, श्री. दिलीप बेनके व श्री. वैभव देशमुख यांनी उपस्थित राहून सफाईमित्रांचा उत्साह वाढविला.
Published on : 25-08-2022 15:23:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update