“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत नवी मुंबईत हजारो युवकांसह नागरिक करणार स्वच्छतेचा जागर
*17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ जाहीर
* या महोत्सवांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमाचे आयोजन
* इंडियन स्वच्छता लीगसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘नवी मुंबई इको क्नाईट्स’ हा संघ जाहीर.
* या संघात सर्व नवी मुंबईकर नागरिकांचा व विशेषत्वाने युवकांचा स्वयंस्फुर्तीने सहभाग.
* सुप्रसिध्द संगीतकार, गायक व नवी मुंबईकर रहिवाशी पद्मश्री श्री. शंकर महादेवन हे ‘नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार’ आहेत.
* इंडियन स्वच्छता लीगमध्ये ‘युथ वर्सेस गार्बेज’ ही टॅगलाईन केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आली असून स्वच्छता कार्यात युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.
* या दृष्टीने दि. 22 सप्टेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
* यामधील सर्वात मोठा उपक्रम राजीव गांधी स्टे़डियम सेक्टर 3 ए, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी 8.30 वा. संपन्न होत असून याठिकाणी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व युवक अस्वच्छता विरोधातील लढाईत सहभागी होणार आहेत.
* याप्रसंगी स्वत: पद्मश्री श्री. शंकर महादेवन उपस्थित राहून युवकांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणार आहेत व युवकांना प्रोत्साहित करणार आहेत.
* तसेच याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते श्री. मकरंद अनासपुरे हे देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करणार आहेत.
* राजीव गांधी स्टेडियम मधील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सिडको प्रदर्शनी केंद्र, सेक्टर 30 ए, वाशी येथेही केले जाणार असून त्याठिकाणीही हजारो विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणाव्दारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
* त्याचप्रमाणे नवी मुंबई शहराचा क्विन्स नेकलेस म्हणून नावाजल्या जाणा-या पामबीच मार्गावर महापालिका मुख्यालय इमारत ते मोराज सर्कल सानपाडा पर्यंत सकाळी 7.30 वा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झळकवत मानवी साखळीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येत असून यामध्ये महिला बचत गट व महिला संस्था आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य व विविध सेवाभावी संस्था प्रतिनिधी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे यावेळी कांदळवन स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे.
* अशाचप्रकारे आणखी एक स्वच्छता उपक्रम सकाळी 7 वा., सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी तृतीयपंथी नागरिक ‘स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग’ असा संदेश प्रसारित करत परिसर स्वच्छ करणार आहेत.
* याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य हे पारसिक हिल, सीबीडी, बेलापूर या निसर्गस्थळी सकाळी 7 वा., ओला, सुका व घरगुती घातक कच-याच्या वर्गीकरणाचे महत्व प्रदर्शित करणार आहेत. तसेच परिसराची स्वच्छताही करणार आहेत.
* स्वच्छता विषयक सातत्यपूर्ण काम करून स्वच्छतेमधील मानांकने उंचाविणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून “इंडियन स्वच्छता लीग”च्या “युथ वर्सेस गार्बेज” या टॅग लाईननुसार स्वच्छता कार्यात युवकांचा सहभाग घेत राजीव गांधी स्टेडियम मध्ये भव्यतम स्वच्छता कार्यक्रम तसेच शहरात इतर 3 ठिकाणी विविध समाज घटकांना सामावून घेत वैविध्यपूर्ण स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत असून युवकांनी तसेच स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 21-09-2022 13:21:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update