नमुंमपा कर्मचा-यांसाठी जीईएम पोर्टलची माहितीप्रद कार्यशाळा
शासनाच्या जीईएम ई मार्केटप्लेस या पोर्टलवरून शासनाच्या सर्व कार्यालयांनी त्याला लागणा-या सेवा वस्तू खरेदी करणे 24 ऑगस्ट 2017 पासून बंधनकारक करण्यात आले असून या पोर्टलची माहिती नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना मिळावी यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जीईएम पोर्टलचे शासन नियुक्त नोडल अधिकार श्री. निखिल पाटील व श्री. नयन जाधव तसेच उद्योग संचालनालयाचे अधिकारी श्री. अमोल बेले यांनी सादरीकऱणाव्दारे जीईएम पोर्टल विषयी सविस्तर माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन उप आयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी उपस्थित वक्त्यांचे स्वागत करून जीईएम पोर्टलची माहिती घेऊन त्याचा महानगरपालिकेच्या कामकाजात वापर करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाचा लाभ गांभीर्यपूर्वक करून घ्यावा असे आवाहन त्यांनी ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष कामकाज हाताळणा-या अधिकारी, कर्मचारी यांना केले.
जीईएम पोर्टलव्दारे डायरेक्ट पर्चेस, एल वन पर्चेस त्याचप्रमाणे पीएसई पध्दत वापरली जात असून त्याचे विविध फायदे वक्त्यांनी विषद केले. पोर्टलला भेट दिली असता सर्वात शेवटी खालील बाजूस ट्रेनिंग मॉडेलमध्ये पीपीटी प्रेझेन्टेशन आणि विविध प्रकारची माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या पोर्टलवर फ्रिक्वेंन्टली आस्क क्वेश्चन ही सुविधा उपलब्ध असून हाऊ टू बिड प्रोसेस ची माहिती त्यांनी समजावून सांगितली.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी प्रशिक्षणाच्या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. भांडार विभागाचे उप आयुक्त श्री. अनंत जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाची सांगता झाली.
Published on : 10-10-2022 13:47:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update