सरदार वल्लभभाई पटेल व प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांना नमुंमपामार्फत अभिवादन

थोर स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करून या महामानवांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन नार्वेकर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परवाना विभागाचे उप आयुक्त डॉ. श्रीराम पवार, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकान, उप आयुक्त श्री. अनंत जाधव, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने आणि कार्याने साध्य झालेल्या राष्ट्रीय ऐक्यासाठी ही शपथ घेत असल्याचे घोषित करीत उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा जतन करण्यासाठी योगदान देण्याचा गांभीर्यपूर्वक निश्चय करित असल्याची सामुहिक शपथ ग्रहण केली.
त्याचप्रमाणे यावेळी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत शासनाने घोषित केलेल्या दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awarness Week) निमित्त राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी तसेच मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांचे दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
Published on : 31-10-2022 13:32:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update