माहे डिसेंबर महिन्याचा महापालिका लोकशाही दिन संपन्न
महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. डिसेंबर महिन्याच्या लोकशाही दिनात अतिक्रमण विभागाशी संबंधीत 1 निवेदन प्राप्त झाले होते. सदर अर्जदार व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
माहे जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि.02 जानेवारी 2023 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि.16 डिसेंबर 2022 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे लोकशाही दिनाकरीता अर्ज असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचे आहे.
सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जादाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये- न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व / अपिल, सेवाविषयक- आस्थापना विषयकबाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशाप्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊन लोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 05-12-2022 09:31:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update