क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत 3 जानेवारी, 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त परंपरेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या नोंदणीकृत महिला संस्था / महिला मंडळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या निमित्ताने महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून आठही विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई याठिकाणी स्पर्धा प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2022 हा आहे.
या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा (विभाग कार्यालयस्तरीय) आयोजित करण्यात आली असून स्वच्छ महाराष्ट्र अभियान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा आधुनिक सावित्री व तिचा आदर्श ! या 3 पैकी एका विषयावर रांगोळी काढावयाची आहे.
मेहंदी स्पर्धा (विभाग कार्यालयस्तरीय) करिता भारतीय संस्कृती हा विषय देण्यात आलेला आहे.
निबंध स्पर्धा "जन्माला ये सावित्री पुन्हा" या विषयावर घेण्यात येत आहे.
पाककला स्पर्धेमध्ये सहभागाकरिता घरगुती सहज सोप्या पौष्टिक पाककला सादर करावयाची आहेत.
याशिवाय सॅलेड सजावट स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा या स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा सहभागाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे आयोजन विभागनिहाय दि. 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेमध्ये होईल.
नृत्य व गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 30 डिसेंबर 2022 रोजी, विष्णुदास भावे नाट्यगृह, तालीम हॉल, पहिला मजला, वाशी येथे सकाळी 9:30 वाजता होणार आहे.
महिला मंडळे / महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2022 अशी असणार आहे.
या स्पर्धांमध्ये केवळ नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिलाच सहभाग घेऊ शकतात. दाखल झालेल्या अर्जापैकी एक अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार महापालिका आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी / कर्मचारी यांनी राखून ठेवलेला आहे.
सर्व स्पर्धांची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती याकरिता संबंधित विभागाच्या समन्वयक कर्मचा-यांशी संपर्क साधावयाचा आहे.
बेलापूर विभाग – श्री. मोहन गायकवाड – 8652441101, श्रीम. अनुपमा आरकडे – 8655590465
नेरुळ विभाग - श्रीम. प्रियंका पाटील – 9082311440, श्री. किरण विश्वासराव – 9819204145
वाशी विभाग - श्री. संतोष सुपे – 8380987456, श्रीम. निलीमा धोंगडे – 9326540277
तुर्भे विभाग - श्रीम. स्वप्नाली म्हात्रे – 9082544474, श्री. जिज्ञेश देवरुखकर - 9004182412
कोपरखैरणे विभाग - श्रीम. स्मिता व्यवहारे – 8689868333, श्री. गजानन चव्हाण – 8888849220
घणसोली विभाग - श्री. संतोष मोरे – 9004098716, श्री. संतोष गावित - 7977170237
ऐरोली विभाग - श्रीम. प्रतिक्षा हुंडारे – 8898329622, श्री. मनोहर राऊत - 9224641224
दिघा विभाग - श्री. विजय चव्हाण – 8291452781, श्री. हेमंत परते – 9545362568
स्पर्धेचे अर्ज महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये तसेच उपआयुक्त, समाजविकास विभाग, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच स्विकारले जातील. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी आयोजित या विविध स्पर्धा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कऱण्यात येत आहे.
Published on : 21-12-2022 13:17:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update