एनएमएमटी वाहनचालक श्री. नंदकुमार लावंड “हिरोज ऑन द रोड” राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
आपल्या 27 वर्षाच्या बसचालक सेवेत विना अपघात सेवा देणारे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे बस चालक श्री. नंदकुमार लावंड यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांच्या हस्ते देशातील राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या शहरांतर्गत बससेवा चालकांना हिरोज ऑन द रोड शिर्षकांतर्गत रस्ते सुरक्षा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका पहिवहन उपक्रमातील वाहनचालक श्री नंदकुमार लावंड (चा.क्र.096132) यांना त्यांच्या 27 वर्षांच्या विना अपघात सेवेकरिता देशातील 42 चालकांसह सन्मानीत करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील चालकास राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर तसेच परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर आणि परिवहन उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी तसेच नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंद यांच्यामार्फत अभिनदन करण्यात येत आहे.
Published on : 21-04-2023 13:09:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update