बेलापूर विभागाच्या धडाकेबाज प्लास्टिक प्रतिबंध कारवाईत 2.25 लक्ष दंडवसूली व 450 किलो प्लास्टिक जप्त
.jpeg)
प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून नागरिकांमध्ये एकल प्लास्टिकचा वापर करू नये याबाबत जनजागृती करतानाच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांव्दारे एकल प्लास्टिकच्या वापर आढळल्यास विभाग कार्यालयांमार्फत धडक कारवाई केली जात आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे शहर स्वच्छतेमधील एक महत्वाचा घटक असलेल्या एकल प्लास्टिकचा वापर थांबविण्याकडे बारकाईने लक्ष असून विभागप्रमुखांच्या बैठकीत त्याविषयी नियमितपणे आढावा घेतला जात आहे.
मे 2023 महिन्यामध्ये विभाग कार्यालयांतील प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकांमार्फत विशेष कारवाई करीत 50 व्यक्ती व दुकानदारांकडून 2 लक्ष 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. तसेच 169.5 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत तांडेल यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाने धडाकेबाज कारवाई करत 33 दुकानांवर व 5 व्यक्तींवर कारवाई करून 450 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे 2 लक्ष 25 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
या मोहीमेमध्ये प्रशासकीय अधिकारी श्री. रमेश राठोड यांच्यासह स्वच्छता अधिकारी श्री. पवन कोवे, स्वच्छता निरीक्षक श्री. किरण सोळस्कर, श्री. विजय नाईक, श्री.मिलिंद तांडेल, श्री.नवनाथ ठोंबरे, वरिष्ठ लिपिक लेखा श्री. मनोज सुतार, वरिष्ठ लिपिक श्री. स्वप्निल तारमळे , लिपिक श्री. धीरेन भोईर, श्री. विठ्ठल देसले व श्री. नयन भोईर सहभागी झाले होते.
प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन नागरिकांनी एकल प्लास्टिकचा पूर्णत: वापर थांबवावा तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाविषयी जागरूकता स्वकृतीतून दाखवावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केलेले आहे.
Published on : 02-06-2023 11:09:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update