इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रामध्ये दुर्मीळ जनुकीय दिव्यांगत्व संबंधित कार्यशाळा संपन्न




नवी मुंबई महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्राव्दारे दिव्यांगांच्या कल्याणार्थ सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. तसेच दिव्यांगत्व प्रतिबंधाकरिता ही विविध उपक्रम राबवले जात असतात. या अनुषंगाने इटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांच्या पालकांकरिता जेनेटिक डिसॉर्डर संबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालकांना दुर्मिळ जनुकीय दिव्यांगत्व (रेअरजेनेटिकडिसॉर्डर) संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी जेनेटिक रिसर्चसेंटर, ICMR-NIRRCH येथील सायंटिस्ट डी विभागाचे प्रमुख असणारे डॉ. शैलेशपांडे, सिनिअर टेक्निकल ऑफिसर श्रीम.नेहा मिंदे आणि सिनिअर प्रोजेक्ट असोसिएट श्रीम. तन्वी अगरबत्तीवाला हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. शैलेश पांडे यांनी सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने जेनेटिक रिसर्च सेंटरच्या कामाची माहिती दिली. तसेच विविध जेनेटिक व्यंग होण्याची कारणे तसेच कोणत्या उपाययोजनांव्दारे याला प्रतिबंध करता येईल या विषयी माहिती दिली. यावेळी डॉ. शैलेश पांडे व श्रीमती. नेहा मिंदे यांनी पालकांच्या शंकांचे निरसन करीत त्यांना सवि़स्त़र माहिती दिली. या वेळी ज्या पालकानी दिव्यांग मुलांचे Karyotyping, FISH, Microarray अशा टेस्टचे रिपोर्ट्स प्रत्यक्ष आणले होते ते पाहून वैयक्तिक मार्गदर्शनही केले.
Published on : 31-08-2023 13:17:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update