*पं.दिनदयाळ उपाध्याय जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन*
थोर विचारवंत व एकात्म मानवतावाद मांडणारे चिंतनशील समाजसेवक पंडीत दिनदियाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या ह्स्ते प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहचला पाहीजे या भूमिकेतून पं. दिनदयाळ उपाध्याय यांनी झोकून देऊन समाजकार्य केले. अंत्योदय म्हणजे उन्नती. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंतचा उदय म्हणजे अंत्योदय. अंत्योदय हा शब्द पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रचलित केला. त्यांच्या सन्मानार्थ 25 सप्टेंबर हा त्यांचा जयंतीदिन ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांनी पं.दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
Published on : 26-09-2023 15:54:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update