‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील मातीचा अमृत कलश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्लीकडे रवाना




भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना केंद्र सरकारच्या वतीने माझी माती माझा देश अर्थात मेरी माटी मेरा देश हा देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यात सर्व नागरिकांना मातृभूमी प्रेमाच्या धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत आठही विभागांमध्ये अमृत कलश यात्रा काढून तेथील घराघरांतून संकलीत केलेली माती विभागीय अमृत कलशात एकत्र करण्यात आली. याकरिता त्यांनी आपापल्या क्षेत्रात अमृत कलशाची उत्सवी स्वरुपात यात्रा काढून विभागांतील घरोघरी जाऊन या कलशांमध्ये घराघरांतील, विभागीय परिसरातील माती संकलित केली.
हे विभाग स्तरावरील माती संकलन केलेले अमृत कलश मुख्यालय स्तरावर आणताना आठही विभागातील मध्यवर्ती स्थळी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत नटून थटून यात्रेत सहभाग घेतला. विभागांमधील ‘अमृत कलश यात्रा’ बँड तसेच पारंपारिक वादये वाजवित परिसरामध्ये फिरविण्यात आली. पंचप्रण शपथ घेऊन सुरु झालेल्या या विभागीय यात्रेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विदयार्थी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतला. या आठही विभागांमधील माती संकलित केलेले अमृत कलश मुख्यालयाजवळील सर्व्हिस रोडवर एकत्रितपणे सजवलेल्या गाडयांमधून आणण्यात आले. त्याठिकाणी विभागांतील आठ अमृत कलशांची विदयार्थी व नागरिकांची बँडपथके, विदयार्थ्यांची लेझीम पथके याव्दारे मुख्यालय इमारतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
हे आठही कलश उत्सवी स्वरुपात यात्रा काढून महानगरपालिका मुख्यालयात विशेष समारंभ आयोजित करुन मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात एकत्र करण्यात आली. हा नमुंमपा मुख्यालय स्तरावरील आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील संकलीत केलेल्या मातीचा अमृत कलश आज शासन निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सजवलेल्या वाहनाव्दारे रवाना झाला.
नमुंमपा आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखविल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेल्या या अमृत कलश यात्रेप्रसंगी अतिरिक्त आयुक्त् श्री. विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त तथा उपक्रमाच्या नोडल अधिकारी श्रीम. ललिता बाबर, उदयान विभागाचे उपआयुक्त श्री. दिलीप नेरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेद्र इंगळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्री. राहुल गेठे, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री.दतात्रेय घनवट, अतिरिक्त शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, शिक्षण अधिकारी श्रीम. अरुणा यादव आणि इतर अधिकारी - कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हा नमुंमपा मुख्यालय स्तरांवरील अमृत कलश फुलांनी सजविलेल्या विशेष वाहनाव्दारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला असून अमृत कलशा सोबत उदयान अधिक्षक श्री. भालचंद्र गवळी आणि उदयान सहाय्यक श्री. लक्ष्मण गोळेकर हे समन्वयक अधिकारी म्हणून तसेच नेरुळ युवा केंद्राचे सदस्य श्री. धनराज शेट्ये आणि श्री. सुशांत पोपळे हे 2 युवा प्रतिनिधी उपस्थित असून हा अमृत कलश ते जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करतील.
तेथून पुढे हा अमृत कलश राज्याच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी मुंबईत नेला जाणार असून तेथून पुढे हा कलश भारताची राजधानी नवी दिल्ली येथे नेला जाणार आहे. या कलशात संकलीत नवी मुंबईतील आठही विभागातील माती नवी दिल्ली येथे उभारण्यात येणा-या अमृत वाटीकेत व शहीद स्मारकात देशातील विविध गावां – शहरातील अमृत कलशातून आणलेल्या मातीसह वापरली जाणार असून या देशव्यापी उपक्रमात नवी मुंबई शहरानेही आपले उत्साही समर्पित योगदान दिलेले आहे. नवी मुंबईच्या अमृत कलशासोबत असलेले 2 युवा प्रतिनिधी नवी मुंबईचे प्रतिनिधीत्व करीत या कलशासोबत भारताची राजधानी नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
या माझी माती, माझा देश उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने कार्यक्रमांचे आयोजन करीत पहिल्या टप्प्यात ‘वसुधावंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रणशपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान’ असे नानाविध उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविले. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 75 देशी वृक्षरोपांची लागवड करीत अमृत वाटिका निर्माण करण्यात आली. अशाच प्रकारे दुस-या टप्प्यात मिरवणूकीव्देर सांस्कृतिक दर्शन घडवित अमृत कलश यात्रेव्दारे घराघरांतून माती संकलन करण्यात आले व 8 विभागांतील माती एकाच नवी मुंबई स्तरावरील कलशात एकत्र करण्यात आली. नवी मुंबईतील माती राजधानी दिल्लीत निर्माण होणा-या अमृत वनामध्ये तसेच शहीद स्मारकासाठी वापरली जाणार असून आज हा अमृत कलश त्यासाठी रवाना झाला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी ज्या उत्साहाने सहभाग घेतला त्यामधून देशप्रेमाचे व एकात्मतेचे दर्शन घडले असे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.
Published on : 26-10-2023 14:34:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update