नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न




नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने गेली 10 वर्ष जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले जात आहे. यावर्षी तर 249 शाळांमधून 35 हजारांहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. शासन मान्यता प्राप्त 49 क्रीडा प्रकारांच्या विविध स्पर्धा महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येतात. यामध्ये इनडोअर व आऊटडोअर खेळाच्या वैयक्तिक व सांघिक प्रकारांत स्पर्धा होत असतात. नवी मुंबई महानगरपालिकेस जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने थेट विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळत असल्याने यामधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:सोबतच शहराचा नावलौकिक वाढविणारे खेळाडू घडत असल्याचे दिसून येत आहे.
सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धांचे वारकरी भवन, सी.बी.डी.बेलापूर येथील सुसज्ज सभागृहामध्ये अत्यंत सुनियोजितरित्या आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षाआतील वयोगटामध्ये 431 विद्यार्थी व 279 विद्यार्थिनी अशाप्रकारे एकुण 710 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त श्रीम. ललिता बाबर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी मैदानी खेळांप्रमाणेच इनडोअर आणि खास करून कॅरमसारख्या बैठ्या खेळांनाही मुले व पालकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आनंद व्यक्त करीत शालेय क्रीडा स्पर्धा हे या मुलांसाठी चांगले व्यासपीठ असल्याचे सांगितले. येथील विजेत्या खेळाडूंना थेट विभागीय स्तरावर खेळता येणार असल्याने याचा लाभ खेळाडू विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घेताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे सर्व शाळांनी विविध खेळांत जास्तीत जास्त खेळाडू कसे सहभागी होतील व त्यांच्या अंगभूत गुणप्रदर्शनासाठी उपलब्ध झालेल्या या व्यासपीठाचा उपयोग जास्तीत जास्त खेळाडूंना कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत व्यक्त केले. यावेळी क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.
कोरोना प्रभावित कालावधीत बहुतांश घरामध्ये मुलामुलींना करमणुकीसाठी कॅरम खेळणे हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला होता. या काळात घराघरात कॅरम खेळत असल्याने या खेळामध्ये सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धा आयोजनासाठी विविध शाळांमधील क्रीडा शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या स्पर्धेतील निकाल -
14 वर्षाआतील मुले :- प्रथम - अल्केश हटकर, सेंट झेवियर्स हायस्कुल ऐरोली; व्दितीय- श्रेय पिळणकर, न्यू होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली; तृतीय - श्रीराज शंकर धनावडे, एमजीएम हायस्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, नेरुळ; चतुर्थ - अर्थव युवराज पथाडे, डी.ए.व्ही.पब्लिक स्कुल ऐरोली; पाचवे- सुयश दत्ताजीराव पवार, डी.ए.व्ही.पब्लिक स्कुल ऐरोली.
14 वर्षाआतील मुली :- प्रथम - साक्षी सुदीप पात्रा, पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन हायस्कुल इंग्रजी शाळा नेरुळ; व्दितीय- अनन्या प्रवीण गोरे – न्यु होरायझन स्कॉलर स्कुल,ऐरोली. तृतीय - रितीका नविन पाटील, प्राथमिक विद्यामंदिर विवेकानंद संकुल सानपाडा; चतुर्थ - ख्याती स्वप्नील कदम, भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम स्कुल सी.बी.डी.; पाचवे - अश्लेषा कल्पेश कांबळे, न्यु होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली.
17 वर्षाआतील मुले :- प्रथम - आदित्य नाईक, सेंट झेवियर्स हायस्कुल ऐरोली; व्दितीय - ऋषीकेश गोपाळ गव्हाणे, एम.जी.एम. हाईस्कुल नेरुळ; तृतीय - आर्यन अनिल सुर्यवंशी, पुणे विद्यार्थी गृहाचे विद्याभवन स्कुल नेरुळ; चतुर्थ - स्पर्श संतोष दिवे, टिळक पब्लिक स्कुल नेरुळ; पाचवे- अमेय सुधीर देसाई, अमृता विद्यालयम नेरुळ.
17 वर्षाआतील मुली :- प्रथम - गायत्री अजित चव्हाण, न्यू होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली; व्दितीय - रिझा अझीझ शेख, रायन इंटरनॅशनल स्कुल सानपाडा; तृतीय - सान्वी स. पायी, न्यू होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली; चतुर्थ - खुशबू नारखेडे, न्यू होरायझन स्कॉलर स्कुल ऐरोली; पाचवे - विश्वजा जाधव, रायन इंटरनॅशनल स्कुल सानपाडा.
19 वर्षाआतील मुले :- प्रथम - क्रिश राजेश पांचाळ, आय.सी.एल.कॉलेज वाशी; व्दितीय - अक्षय विजय मोरे, श्रीमती सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज ऐरोली; तृतीय - मनिष एकनाथ चव्हाण, आय.सी.एल.कॉलेज वाशी; चतुर्थ - निखील राजेश चौरे, स्टर्लिंग ज्युनिअर कॉलेज; पाचवे - मोहम्मद सलिम तनवीर अहमद, अंजुमन इस्लाम स्कुल, तुर्भे.
19 वर्षाआतील मुली :- प्रथम - रुतुला सुनिल ढेब, श्रीमती सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज ऐरोली; व्दितीय - आर्या संतोष शिपाई, आय.सी.एल.कॉलेज वाशी; तृतीय - संस्कृती जगताप, आय.सी.एल.कॉलेज वाशी; चतुर्थ - कश्मिरा विक्रम मेहेर, जयपुरियार स्कुल सानपाडा; पाचवे - शेख सामिया सय्यद अली, आय.सी.एल. कॉलेज वाशी.
या नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विजयी झालेल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंनी पुढील स्तरावरील मुंबई विभागीय कॅरम स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केलेला असून या विजयी खेळाडूंचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी त्यांना पुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.
Published on : 06-11-2023 05:56:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update