सावित्रीच्या लेकींनी घडविले विविध कलाविष्कारांचे लक्षवेधी दर्शन
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांच्या शिक्षणापासून सुरू झालेल्या सर्वांगीण प्रगतीच्या उद्गात्या, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रणी समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ असा अभिमान व्यक्त करीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध स्पर्धा उपक्रमांतून आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले.
याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रेरणादायी स्मृतीला अभिवादन करण्यासाठी व महिलांच्या स्पर्धांतील उल्लेखनीय कामगिरीचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यासाठी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ व श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, माजी नगरसेविका श्रीम. कमलताई पाटील, श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. उषा भोईर, ॲड. भारती पाटील, श्रीम. सुवर्णा पाटील, श्रीम. सायली शिंदे, समाजसेवा अधिकारी श्री. सर्जेराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार श्री. गणेश नाईक यांनी महिला सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका उत्तम कामगिरी करीत असल्याबद्दल प्रशंसा केली. तसेच आज क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करताना महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली म्हणजेच ती ख-या अर्थाने सक्षम झाली असे मत व्यक्त करीत त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशी सूचना केली.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाईँनी केलेल्या त्यागामुळेच आज महिलांच्या सर्वांगीण प्रगतीला गती लाभली असल्याचे सांगितले. महिलांकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्राधान्याने मोठ्या प्रमाणावर योजना राबविते व त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळतो. त्यासोबतच महिलांच्या विविध गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित सर्वच स्पर्धांना इतक्या मोठ्या संख्येने उत्साही सहभाग लाभला त्याबद्दलही त्यांनी महिलांचे कौतुक केले.
अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांनी समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या महिला व बालकल्याणपर योजना व उपक्रमांची माहिती देत आपल्या अनेक योजनांचे अनुकरण इतर महानगरपालिकांमार्फत केले जात असल्याचे सांगितले.
भिमनगर, रबाळे येथील महिला विकास आणि शिशू संस्कार केंद्र यांना प्रतिवर्षी दिला जाणारा यावर्षीचा मानाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार आमदार श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व रू. 21 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्याचप्रमाणे विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये गायन स्पर्धेत मंगला भोई, वेदांती भोई, सोनल जाधव यांना अनुक्रमे 3 क्रमांकाची व प्रिती गजरे, सुजाता माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले.
नृत्य स्पर्धेत 18 ते 30 वयोगटात साक्षी वडजे, वैशाली शेवाळे, सायली भोसले यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची तसेच आकांक्षा पाटील व धनश्री बागर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक वितरित करण्यात आली.
नृत्य स्पर्धेच्या 30 वयापुढील गटात मृणाल वानखेडे, गौरी खोबरेकर, छाया कोपरे यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची तसेच निशा सरवदे व सोनिया गुप्ता यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण झाले.
निबंध स्पर्धेत सारिका जेथे, राजेश्री कांबळे, उषादेवी सुरवाडे यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची तसेच आरती अवचर व प्रतिभा कुंकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
सॅलेड सजावट स्पर्धेत लक्ष्मी शेळके, मयुरी तांडेल व हर्षाली रानकर यांना तसेच पाककला स्पर्धेत सुनिता खाटपे, धनश्री रानकर, सुचित्रा रेडकर यांना त्याचप्रमाणे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूनिर्मिती स्पर्धेत प्रभा राव, वृषाली पाटील, मीरा मंडलिक यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
अशाच प्रकारे आठ विभागनिहाय घेतलेल्या रांगोळी व मेहंदी स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येक विभागासाठी 3 व काही उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. सर्व पारितोषिक विजेत्यांना रु.3000/-, रु.2000/- व रु.1000/- रक्कमेची पारितोषिके सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ असा अभिमान व्यक्त करीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
Published on : 09-01-2024 13:53:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update