कोपरखैरणे विभागात विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील विनापरवानगी होत असलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे याविरोधात धडाकेबाज कारवाई सुरु असून आज ही महापालिका आयुक्त् यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त् डॉ. राहुल गेठे यांचा मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागात अनधिकृतरित्या विनापरवानगी बांधलेल्या अतिक्रमण बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रातील 1) मे.वैदेश्वर डेव्हलपर्स (वैष्णवी इंटरप्रायजेस), शॉप नं 15,भूखंड क्र 72,सेक्टर-5,कोपरखैरणे 2) मे.वैदेश्वर डेव्हलपर्स (मोनालीसा पॅलेस) शॉप नं 16,भूखंड क्र 72,सेक्टर-5,कोपरखैरणे यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1)अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या पोटमाळ्याचे बांधकाम केले होते.
तथापि याबाबत संबंधितानी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून त्यांच्यामार्फत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त तसेच,10 मजूर , 1 पिकअप व्हॅन, 2 इलेक्ट्रॉनिक हॅमर , गॅस कटर 1 इत्यादी चा वापर करण्यात आला, यापुढील काळात ही संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व आठही विभाग कार्यालय परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाया तीव्रतेने राबविल्या जाणार आहेत.
Published on : 22-02-2024 12:44:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update