घणसोली विभागात अतिक्रमण निर्मुलनाची धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील ठाणे बेलापुर रोडवरील अवैधरित्या धंदे होते, सदर धंदयामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे, त्यांच्यावर दिनांक 09/01/2024 रोजी पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. सदर अवैधरित्या धंदयावर अतिक्रमण विभाग घणसोली विभाग यांचेकडून सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार या मोहिमेमध्ये 04-हातगाडया, 01 पान टपरी, 01 ऊसाचा रसाचा गाडा, 01 लिंबु सरबत चारचाकी गाडी, 02 निरा टपरी व 01 सोडा गाडी यांचेवर कारवाई करणेकरिता दोन हायड्रा मशिन, दोन डंपर व 01 पिक अपव्हॅन यांच्या साहाय्याने सदरचे साहित्य उचलण्यात येवुन कोपरखैरणे डपींग येथे जमा करण्यात आले आहे. सदरची धडक मोहिम उप आयुक्त (अतिक्रमण) व सहाय्यक आयुक्त, घणसोली यांच्या मार्गदर्शनाखाली एफ विभाग घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, पोलीसपथक यांच्या सहाय्याने सदरची कारवाई करण्यात आली.
यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 22-02-2024 13:06:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update