घणसोली विभागात अतिक्रमण निर्मुलनाची धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील
1) श्री.नितीन राऊत (घरमालक व विकासक), घर क्रमांक-55, से.21, तळवली, घणसोली यांचे तळ मजला + पहिला मजल्याच्या कॉलमचे बांधकाम प्रगती पथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
- श्री.भिमराव म्हात्रे(जागामालक) व श्री.निसार अहमद (विकासक) सर्व्हे नं.56,57 व 62 तळवली, से.21, घणसोली नवी मुंबई यांचे तळ मजला + पहिला मजला स्लॅबचे काम प्रगती पथावर होते., नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरु होते. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटविणे आवश्यक होते.पंरतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरच्या दोन्ही ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिका व मे.सिडको यांनी संयुक्त तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदर अनधिकृत बांधकाम 02 पोकलेन मशिन्स, 01 जेसीबी,15 कामगारयांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी व सिडको अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
Published on : 13-03-2024 12:37:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update