तुर्भे विभागात विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत मे. बांधकामधारक, भुखंड क्र. A-2/363, से.20, तुर्भे, नवी मुंबई, यांनी विनापरवानगी भुखंड क्र. A-2/363 येथे सुमारे 5.50 मी.x 4.25 मी. या मोजमापाचे R.C.C. Plinth चे बांधकाम सुरु होते.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. सदर अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या खर्चा पोटी रक्कम रु.15,000/- इतकी वसुली करण्यात आली आहे.
तसेच तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत रस्ते / पदपथावर विनापरवानगी / अनधिकृत स्टॉल उभारण्यात आलेले होते. सदर स्टॉल हटविण्याकरीता नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने मोहिमेचे आयोजन करुन दि.17 जानेवारी 2024 रोजी 07 व दि.18 जानेवारी 2024 रोजी 02 अनधिकृत स्टॉल हटविण्यात आलेले आहेत.
याशिवाय रस्त्यावर विनापरवानगी उभी असलेली बेवारस वाहने देखील कारवाई करुन कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आली आहेत.
तसेच विनापरवानगी होर्डिंग / बॅनर्स / पोस्टर्स व अनधिकृत फेरीवाले यांच्यावर नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे.
सदर मोहिम मा. आयुक्त सो. यांचे आदेशान्वये मा. उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेटे, यांचे मार्गदर्शनाखाली व मा. सहाय्यक आयुक्त, तुर्भे श्री. भरत धांडे, यांचे नियंत्रणाखाली तुर्भे विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे.
तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते.
वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता 02 इलेक्ट्रीक हॅमर, 01 गॅसकटर, 10 मजूर यांचा तसेच अनधिकृत स्टॉल हटविण्याकरीता जे.सी.बी. व ट्रक यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच बेवारस वाहने हटविण्याकरीता टोईंगव्हॅनचा वापर करण्यात आलेला आहे.
तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 13-03-2024 16:41:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update